कोरोनामुळे हातनूर गावचा बुधवारचा आठवडी बाजार रद्द

कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर हातनूर  गावचा बुधवारी होणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आठवडी बाजार होणारी गर्दी टळणार आहे.
हातनूर:- (शशिकांत भोरे)
               हातनूर गावचा आठवडी बाजार हा दर बुधवारी गावच्या कै.पै.काका बापू पाटील व्यायाम शाळेच्या मैदानावर व ग्रामपंचायती जवळ या मध्यवर्ती भागात भरत असतो. या बाजारात हातनूर गावासह तासगाव तालुक्यातील पेड, विसापूर, मांजर्डे, या गावातील शेतकरी व व्यापारी भाज्या खरेदी व विक्री साठी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या आठवडी बाजारातील होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पुढील आदेश होई पर्यंत गावातील आठवडी बाजार रद्द करण्यातआला आहे. यांची माहिती हातनूर ग्रामपंचायतीच्या सरपंच  सौ.कमल घेवारी यांनी दिली आहे.