तासगाव मधील गणपती मंदिर दर्शनासाठी बंद.

कोरोना मुळे तासगाव मधील गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळं तासगावचे आराध्य दैवत श्री गणपती मंदिर 17 मार्चपासून जनहितासाठी पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय गणपती मंदिर ट्रस्टने घेतला आहे. याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.


तासगाव:-  
              कोरोनामुळं संपुर्ण देशात खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 100 पार झालेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे
महाराष्ट्रातील आहेत. प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत यापुर्वीच सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक देवस्थानांनी मंदिरे
दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय यापुर्वीच
घेतलेला आहे. आता तासगावतील गणपती मंदिर ट्रस्टने देखील दि. 17 मार्चपासून जनहितासाठी पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती गणपती देवस्थानचे ट्रस्टचे व्यवस्थापक  यांनी दिली.

तासगाव तालुक्यातील बातम्याचे व्हाट्सअप वरती अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लीक करा


Reactions

Post a Comment

0 Comments