'कोरोना’मुळे हातनूर मधील अखंड हरीनाम पारायण सप्ताह पुढे ढकलला. 


हातनूर:
             तासगाव तालुक्यातील हातनुर या गावातील इंचगिरी रसाळ संप्रदाय व दत्त मंदिर ट्रस्ट यांचे वतीने घेण्यात अखंड हरिनाम सप्ताह कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या भीतीमुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे
तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढे ढकलण्यात आला आहे.
             हातनूरमध्ये सालाबाद प्रमाणे घेण्यात येणारा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीही  गुढीपाडव्यापासून सुरू होणार होता.पण कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व सांगली जिल्ह्यामध्ये अध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असल्याने,  शासनाच्या नियमांचा आदर ठेवून व सामाजिक बांधिलकी जोपासून या विषारी विषाणुच्या  प्रादुर्भावाने वाढू नये व  अखंड हरिनाम सप्ताह च्या माध्यमातून येणाऱ्या लोकांना किंवा समाजातील विविध घटकांना त्याचा कोणताही त्रास होऊ नये.आपणही या समाजातील एक जबाबदार घटक आहोत याचे पूर्ण भान ठेवून गुरुदेव अण्णा भैया व तुका भाऊ यांच्याशी चर्चा करून हातनुर इंचगिरी रसाळ संप्रदाय चे सर्व गुरूभक्तमंडळी व दत्त मंदिर ट्रस्ट यांचे वतीने यावर्षी पासून सुरु होणारा 25 मार्च  2020 ते 29 मार्च 2020 या कालावधीत होणारा अखंड हरिनाम सप्ताह काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली.तसेच सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.