आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डमध्ये माता पिता दिन उत्साहात साजरा
⭐ प्रा वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद⭐
विटा:
विटा येथील लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथे शनिवार दि.१५/०२/२०२० रोजी माता पिता दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.व त्यानिमित्ताने प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.प्रा.वसंत हंकारे सर होते,तसेच आदर्श बी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य महाजन सर व आदर्श डी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य हवालदार सर, ब्लुमिंग बड्ज नर्सरी स्कुलच्या प्रमुख सौ.विद्या गायकवाड मँडम व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम उपस्थितीत होत्या.
या व्याख्यानात वसंत हंकारे सरांनी पाल्याच्या सर्वांगीण विकासा मध्ये पालकांची मुख्य भूमिका काय असावी या विषयावर अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना समोर बसवून त्यांचे विधिवत औक्षण करून आशीर्वाद घेतले. पालकांनीही आपल्या पाल्याला यशस्वी जीवनासाठी सदिच्छा दिल्या.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आतिशय सुरेख असे नृत्य सादर केले.शाळेने अशा आगळ्या वेगळ्या राबवलेल्या उपक्रमाबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.रघुनाथ पवार सर यांनी केले.व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ कल्पना पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वांचे कौतुक केले व माता पिता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments