जत मार्गावर, पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या अरकेरी वस्तीवर
जन्मदात्या मुलानेच शेतजमिनीच्या वादातून आई नागव्वा गुरलिंगाप्या अरकेरी (वय ७५),वडील गुरलिंगाप्पा आण्णाप्या अरकेरी (वय८२) यांची तसेच बहिण समुद्राबाई मृत गुरुलिंगाप्पा अरकेरी मृत नागव्वा अरकेरी मृत समुद्राबाई बिराजदार शिवलींगाप्पा बिराजदार (वय ६२, सर्व रा.उमदी) यांचा लाकडी दांडक्याने डोक्यावर गंभीर वार करून निघृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अतिशय थंड डोक्याने आरोपी सिदाप्पा याने सकाळच्या प्रहरी हे कृत्य केले.दरम्यान बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिदाप्पा गुरूलिंगाप्पा अरकेरी (वय ५८, रा. उमदी) असे आरोपीचे नाव आहे.घटना घडल्यानंतर आरोपी हा स्वतः हून उमदी पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून पोटच्या मुलानेच केली आई वडील व बहिणीची हत्या.

जत:-
                मुलानेच आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे ही घटना घडली. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. या घटनेचे वृत्त ऐकून सारेच सुन्न झाले आहेत.
           गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (82), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (75) आणि समुद्राबाई बिरादार (62) अशी मृतांची नावे आहेत. संशयित सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (58) याने हे तिहेरी हत्याकांड केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून घटनास्थळी उमदी आणि जत पोलीस दाखल झाले आहेत. आज सकाळी हा हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गावकरी तसेच नातेवाईकही दाखल झाले असून काहीसे तणावाचे वातावरण आहे. जमिनीच्या वादातून मुलानेच केली आई-वडील व बहिणीची हत्या केली.पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.