तासगाव कृषी उत्पन्न बाजार
समितीमध्ये चिंचेला 16 हजार दर
तासगाव:-
तासगाव येथे कृषी उत्पन्न बाजार
समितीमध्ये नवीन चिंचेची आवक
सुरू झाली आहे. बुधवारी झालेल्या
सौद्यामध्ये चिंचेला प्रति क्विंटल
14 हजार पाचशे ते १६ हजार शंभर
रुपये असा उच्चांकी दर मिळाला,
अशी माहिती बाजार समितीचे सचिव
चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
ते म्हणाले, बाजार समितीमध्ये
एकूण ६ आडत दुकानांमध्ये नवीन
चिंचेचे सौदे काढण्यात आले होते.
बुधवारी या नवीन चिंचेची आवक
१७१ पोती झाली, तर सर्व पोत्यांची
विक्रीही झाली. यावेळी बाजार
समितीचे सभापती अजित जाधव,
उपसभापती धनाजी पाटील, संचालक
कुमार शेटे यांच्यासह सर्व शेतकरी, उपस्थित होते.
0 Comments