हातनूर मध्ये धुलीवंदन निमित्त भरवण्यात आले कुस्ती मैदान
हातनूर :(शशिकांत भोरे)
हातनूर मधील मातंग समाजातील बांधव गेल्या 150 वर्षा पासून चालत आलेल्या परंपरेचे केले जतन.गेल्या 150 वर्षापासून धुळ्वडी दिवशी या ठिकाणी कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते .या कुस्ती मैदानात एक रुपयापासून ते 10 हजार रुपये इनामाच्या कुस्त्या या मैदान वर झाल्या.शेकडो शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्याऱ्या कुस्त्या या मैदानावर झाल्या
यावेळी या कुस्ती मैदानात हातनूर मधील उमदे पैलवान नामदेव लोखंडे, गोपीनाथ लोखंडे, शेखर लोखंडे, प्रेम लोखंडे, भागवत भाट, सुदेश पाटील यांनी झालेल्या लढतीत विजय मिळवला.
त्यावेळी पै.श्रीकांत लोखंडे, पै.विजय लोखंडे, पै.संभाजी लोखंडे, पै.सुरेश लोखंडे,उत्तम लोखंडे, यांनी पंच म्हणून काम पाहिले.
हातनूरचा कुस्ती क्षेत्रात इतिहास खूप मोठा आहे.सांगली जिल्ह्यातील एक नावाजलेले गाव हातनूर या गावात अनेक पैलवान होऊन गेले.राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती कलेला राजाश्रय मिळवून दिला. तो वारसा हातनूर गावचे लोक लोकाश्रयातून जपत आहेत.लोकसहभागाच्या पाठबळावर खेड्यापाड्यातील तरुण कुस्तीचा छंद आजा-पणजोबापासून जपत आहेत. कुस्तीगिरीबरोबर वस्तादगिरी अन् कुस्तीचे फड भरविणारे शिलेदार गावपांढरीचा कसदारपणा जपत आहेत.
हातनूर मधील कुस्त्याचे हे मैदान यशस्वी पणे पार पडण्यासाठी पै.श्रीकांत लोखंडे,पै.सुरेश लोखंडे, पै.विजय लोखंडे, पै.संभाजी लोखंडे,संपत भोरे, सचिन भोसले, संपत लोखंडे, रमेश लोखंडे,राजू सोनटक्के, भीमराव भोरे, विकास भोरे सागर भोसले, प्रकाश जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
0 Comments