मिसेस मुख्यमंत्री झाल्या लोकांच्या टिकेच्या धनी


मिसेस मुख्यमंत्री झाल्या टिकेच्या धनी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, त्यांनी  त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सगळी कडून टीका होत आहे.आपण राष्ट्रपिता म्हणून केवळ महात्मा गांधी यांचाच उल्लेख करतो पण अमृता फडणवीस यांनी थेट मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, असे म्हटले आहे.
त्यामूळे त्यांच्यावर टीका होत आहे.