भारताला पाकिस्तान विरोधात मिळालं घातक हवाई ‘अस्त्र’
संरक्षण संशोधन विकास संस्थाने तयार केलेल्या अस्त्र मिसाइलमुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. अस्त्र हे हवेतून हवेत हल्ला करणारे मिसाइल आहे. मंगळवारी इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-३० एमकेआय या अत्याधुनिक फायटर विमानामधून ‘अस्त्र’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुखोईमधून डागण्यात आलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राने हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
अस्त्र हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे दृष्टीपलीकडचा लक्ष्यभेद करणारे हवेतून तो हवेत मिसाइल आहे.
हे अस्त्र ताशी ५,५५५ किलोमीटर वेगाने लक्ष्याच्या दिशेने जाते
– या अस्त्रमध्ये ७० किलोमीटर अंतरावरील लक्ष भेदण्याची क्षमता आहे.
अस्त्र १५ किलोपर्यंत स्फोटके वाहून नेऊ शकते.
त्यामूळे भारताला आपली हवाई सुरक्षा अधिक मजबूत करता येणार आहे.तसेच भारताच्या हद्दीतून पाकिस्तानमधील शत्रू वर ही हल्ला करू शकतो.
– अस्त्रची रचना वेगवेगळया उंचीवरील लक्ष्यभेदण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
भविष्यात अस्त्रचा पल्ला ३०० किलोमीटरपर्यंत करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
0 Comments