मंत्रालयाच्या इमारतीवरून घेतल्या शिक्षकांनी उड्या
मंत्रालयात आज पुन्हा एकदा आत्महत्या प्रकरण सुरू झाले आहे. दोन शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्ये करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने मंत्रालयात इमारती मध्ये संरक्षक जाळी लावली आहे, त्यामुळे दोन्ही शिक्षकांचे जीव वाचले आहेत.
दिव्यांग शाळांना शासकीय अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी मंत्रालयात आलेल्या दोन शिक्षकांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मंत्रालयाच्या परिसरात एकच तारांबळ उडाली.दोन्ही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.संरक्षक जाळीमुळे दोघेही सुरक्षित आहेत. दरम्यान, अचानक उडी मारल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी लगेच धाव घेत दोघांनी संरक्षक जाळीवरून उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी आंदोलकांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा व नारे देण्यात आले.
0 Comments