आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
विटा-
दि.०९/०२/२०२० रोजी कराड येथे राज्यस्तरीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप २०१९-२० या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यांतील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्या स्पर्धेत विट्यातील लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत दहा वर्षाखालील वयोगटात वेस्टर्न डान्स प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.तसेच १७ वर्षाखालील वयोगटात वैयक्तिक वेस्टर्न डान्स प्रकारात द्वितीय क्रमांक पटकिवला असून त्यांची निवड राष्ट्रीय पातळी वर झाली आहे.
यामध्ये कु.अनुष्का कुंभार (इ-४थी),कु.शशिता मोहिते (इ-४थी),कु.सृष्टी कांबळे (इ-४थी),कु.अनुष्का कांबळे (इ-४थी),कु.आर्या ढवळे (इ-४थी),कु.दिप्ती शिंदे (इ-४थी), कु.श्रेया चव्हाण (इ-४थी) यांनी दहा वर्षाखालील वयोगटात सहभाग घेतला होता त्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला.तसेच कु.प्रचिती चव्हाण (इ-९ वी )हिने १७ वर्षाखालील वयोगटात सहभाग घेतला होता त्यात तिने द्वितीय क्रमांक मिळवला.
या सर्व विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना सहा.शिक्षिका सौ.कांचन शिंदे व अजित सकटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments