आदर्श पब्लिक स्कूल सी.बी.एस.ई विटा येथे मातापिता पुजन दिन उत्साहात संपन्न
विटा:-लोकनेते मा हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित
आदर्श पब्लिक स्कूल सी.बी.एस.ई विटा येथे माता पिता पुजन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे महत्व जाणून आदर्श पब्लिक स्कूल च्या विदयार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती व साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. प्रदिप लवटे यांच्या हस्ते करून करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अॅड. वैभव(दादा) पाटील व नगराद्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील उपस्थित होते
या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम आईवडिलांचे चरण धुऊन आई वडिलांचे पूजन करून त्यांना मिठाई भरविण्यात आली. या कार्यक्रमातून आई वडिलांची कृतज्ञता व्यक्त करणेत आली. अश्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू आले होते.त्यांनी मुलांचे व शाळेचे कौतुक केले.
सर्व पालकांनी विद्यार्थ्यांच्या बाल मनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा उद्देश पूर्ण केला व आभार मानले.
या कार्यक्रमास मार्गदर्शन संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. पी. टी. पाटील सर, प्राचार्य श्री. दत्तप्रसाद मिठारी यांनी केले तर नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. संदिप कार्वेकर (सर) समन्वयक सौ. राजेश्री चव्हाण व श्री जयदेव मोहिते यांनी केले. तर सुत्रसंचालन श्री. श्रीनिवास केरेमनी सर यांनी आभार सम्राट शिंदे सर यांनी मानले.
0 Comments