“राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार”![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjG_3Qwn8cvvDkMIVzDFF9yNidVMcvyqJzw68U2Bg035cQzfLaPFTycGOS39p73y0Azy3M9HrUeDWQCRway3j2m3hwZbI59ZEZ3hodzUicrHY1M94xZk8KQ0xruZAPQNtO0CT6WoKkDXpY/s400/police-recruitment-anil-deshmukh-696x364.jpg)
पुणे :-महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात मोठी घोषणा केली आहे. मागील सरकारने गेल्या पाच वर्षात पोलिस भरती केली नव्हती. मात्र आम्ही आता पोलिसांच्या 8 हजार जागा तसेच सिक्युरिटी गार्डच्या 7 हजार जागा भरणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
बलात्कार गुन्ह्यांबाबत आंध्र प्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचाही आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी 20 फेब्रुवारीला मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाणार असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
हिंगणघाटसारख्या घटना रोखता याव्यात यासाठी आंध्रप्रदेशमधील कायदा महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आगामी काळात पुण्यात दिड ते दोन लाख सीसीटीव्ही बसवणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली आहे.
0 Comments