म्हासुर्णे - म्हासुर्णे गावातील सर्व प्रमुख रस्ते बंद (छाया - तुषार माने)

म्हासुर्णे : तुषार माने
         खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे  कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मागील दहा दिवसापूर्वी मुंबई वरून आलेल्या एका 
व्यक्तीच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले होते. तरी आज उशिरा त्याचे रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने गावामध्ये सायंकाळी वडुज तहसीलदार अर्चना पाटील,गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख,निमसोड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका पाटील यांनी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.
        यावेळी सरपंच सचिन माने, उपसरपंच सुहास माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,गुलाब वायदंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तरी गावचा संपूर्ण सर्व्हे करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.तरी या पेशंटच्या संपर्कातील हाय रिस्क असणार्‍या चार जणांना मायणी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये विलगीकरणं कक्षात दाखल करण्यात आले असुन लो रिस्क असणार्‍या सहा जणांना होम काॅरटाईन करण्यात आले आहर.तरी गावातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले
आहे.