कराड:- सूरज घोलप (बाबा)
              आदिवासी विकास विभागाचे मंत्री ना.के .सी. पाडवी यांनी महाराष्ट्र दिनी टाळेबंदी च्या काळामध्ये आदिवासींच्या अर्थार्जनाची अडचण लक्षात घेऊन खावटी अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी तीन हजार रुपये मदत केली जाणार आहे. रुपये दीड हजार मनीऑर्डरने तर रुपये दीड हजार जीवनावश्यक वस्तू स्वरूपात दिले जाणार आहेत.
राज्यातल्या मनरेगा कामावर आदिवासी कुटुंबे, पारधी कुटुंबे तसेच जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. टाळे बंदीमुळे भटकंती थांबल्याने पारधी कुटुंबाची उपासमार सुरू असल्याने सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील कराड २३, सातारा ६४, कोरेगाव ७३, वाई ११, खंडाळा ७८, फलटण १५३, दहिवडी १९, खटाव ७७ एकूण ४९८ आदिवासी पारधी कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांना भेटून  निवेदनाद्वारे केली आहे. तसेच राज्याचे आदिवासी सचिव, सहसचिव व जिल्हाधिकारी सातारा यांना संकेतस्थळावर निवेदनाद्वारे दिली आहे.
----------------------------------
माननीय संपादक दैनिक.,........... यांचेकडे प्रसिद्धीसाठी सविनय. आपला विनीत,
 प्रकाश वायदंडे (अध्यक्ष ,पारधी मुक्ती आंदोलन. महाराष्ट्र राज्य)