म्हासुर्णे : तुषार माने
           कोरोनाच्या विषाणुचे सर्व मानव जातीवर आलेले महासंकट आणि सर्व स्तरातून या संकटाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र आलेले हात आपआपल्यापरीने जो तो योगदान देत आहे .या लढाईतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पोलीस यंत्रणा असुन या युद्धात  पहिला आघाडी सांभाळणारा हातावर शीर घेऊन लढणारा पोलीसांसाठी आपण काही तरी देणे लागतो या भावनेने अौंध येथील जागरूक नागरिक श्री उदय व जयवंत एकनाथ जगदाळे यांनी पोलीस यंत्रणेच्या  मागे आपलाही योगदानाचा 
हात लावण्याचे ठरवले.

           त्याप्रमाणे जगदाळे यांनी माण-खटाव उपविभागीय कार्यालय वडुज व  पोलीस स्टेशन औंध येथे उच्च दर्जाचे मास्क व हॅण्डग्लोज सॅनेटायझर आणि ड्युटीवर असताना सहज खाण्यायोग्य आणि पौष्टिक असे  प्रत्येकी 250 ग्रॅम ड्रायफूटची पाकीटे अशी साठ युनीट्स त्यांनी पोलीस यंत्रणेला दिली.
यावेळी अौंधचे स.पो.नि.उत्तम भापकर, स्नेहल सोमदे, माण-खटाव उपविभागीय कार्यालयाचे पोलीस कर्मचारी सुहास खाडे व सर्व पोलिस कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री सागर जगदाळे उपस्थित होते.
तरी या जगदाळे बंधूच्या आदित्य मिल्कच्या माध्यमातुन केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक खटाव-माणचे उपविभागीय पोलीस अधिकारी 
श्री. बी.बी. महामुनी,स.पो.नि. श्री बी.डी.बर्गे,
श्री.स्मितल शहा, मा.सभापती संदिप मांडवे, शिवकृपा बँकचे मॅनेजर श्री राजेश निकम,
श्रीराज मिल्कचे चेअरमन श्रीकांत पिसाळ,
श्री अभिजीत म्हामने श्री .विजय जाधव,श्री  सुयोग शेटे ,श्री महेश भंडारी, श्री.शशिकांत घार्गे औंध यमाई देवी देवस्थानचे पुजारी श्री.राजेंद्र गुरव तसेच अौंध परिसरातील सर्व स्तरातून या विशेष उपक्रमाचे कौतुक होत आहे.