म्हासुर्णे:तुषार माने
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील लाडेगावात परप्रांतीय कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
या कुटुंबाना जिल्हाध्यक्ष दादासाहेब अोव्हाळ  यांच्या सूचनेनुसार खटाव तालुका कार्याध्यक्ष अनिल उमापे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन एकप्रकारे मदतीचा हात पुढे केला असल्याचे लाडेगाव ग्रामस्थांकडून बोलले
 जात आहे.
तरी ‌लाडेगावातील परप्रांतीय असलेल्या दहा कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल एवढा धान्यसाठा दिला असुन यामध्ये तेल, गहू, साबण व अन्य वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्या रत्ना बाळासो उमापे, विशाल मांडवे, गोविंद तापकीर, संदीप उमापे, यश भंडारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.