विद्यार्थी  घरी बसून व्हॉट्सपग्रुप व (zoom app) च्या माध्यमातून शिकतात अभ्यासक्रम


 विटा :-शशिकांत भोरे
              विटा येथील आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विद्यालयातर्फे सध्याच्या लाॅकडऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी घरी बसून झूम अॅप (zoom app ) व व्हॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्यास सुरूवात केली आहे.पालक व विद्यार्थी यांच्यातून या उपक्रमास उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे या आदर्शवत उपक्रमाचे कौतुक होत आहे.
        लाॅकडऊनला सुरूवात होऊन तबल दीड महिना संपत आला आहे विद्यार्थ्यांचा शाळेशी व शिक्षकांशी संबंध नाहीत परीक्षा ही नाहीत लाॅकडऊन किती वेळ लागतो ते ही माहिती नाही याला पर्याय म्हणून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मा. अंजुम बागवान मॅडम व  Co-ordinator  समन्वयक मा. श्री भालचंद्र किंणगे सर यांनी (zoom app) झुम अॅप व व्हॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 
रोज पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांना सकाळी 9ते 11 या वेळापत्रकानुसार आॅनलाईन शिकवण व अभ्यास दिला जातो.
 विद्यार्थ्यांना आकलन सोपे होईल असे व्हीडिओ द्वारे शिकवले जाते मुलांना काही शंका असल्यास ग्रुपवर व वैयक्तिक फोनवरून निरसन केले जातात.

जाहिरात