कराड:सुरज घोलप बाबा 
            आदिवासी पारधी जमातीचे कुटुंबांना "खावटी "वाटप करण्यात यावे! पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचेकडे पारधी मुक्ती आंदोलनाचे वतिने मागणी करण्यात आली.
देशभरात कोरोना विषाणू चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असुन संपूर्ण राज्यभर 'लाॅकडाऊन'करण्यात आला आहे.लॉकडाऊन मुळे आदिवासी पारधी जमातीमधील लोकांची भटकंती थांबली असून या लोकांची उपासमारी चालू आहे.
अनुसूचित जमातीमधील कुटुंबांना "आदिवासी विकास महामंडळ नाशिक"यांचे कार्यालयाकडून खाऊ वाटप करण्यात येत असते. तथापि सातारा जिल्ह्यामध्ये ८ तालुक्यात सध्या तालुकानिहाय कुटुंबे पुढील प्रमाणे-१) सातारा -६४,२) कराड -२३,३) कोरेगाव- ७३,४) वाई-११,५) खंडाळा-७८,६) फलटण-१५३,७) दहिवडी-१९ व ८) खटाव-७७ एकूण एकंदर ४९८ इतकी पारधी कुटुंबे वास्तव्यास आहेत.
लॉक डाऊन व संचार बंदीमुळे पारधी जमातीच्या लोकांना चरितार्थासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व पारधी कुटुंबांना तीन महिन्या- साठीचे खावटी वाटप करण्यात यावे. अशी मागणी पारधी मुक्ती आंदोलनाची वतीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकार पणन , सहकार व पणन मंत्रीनामदार बाळासाहेब पाटील यांचेकडे पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याशिवाय दलित कुटुंबाव- रही लॉक डाऊन व संचार बंदीमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे .या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात यावे ,अशी मागणी नामदार पाटील यांचे कडे प्रकाश वायदंडे यांनी केली आहे.