हातनूर ग्रामपंचायतीच्या वतीने आशा सेविका कर्मचाऱ्यांना सेफ्टी किटचे वाटप.
हातनूर:शशिकांत भोरे
राज्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भावावर या परिस्थितीत गावात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आरोग्य विषयक माहिती व सर्वेक्षण करीत असणाऱ्या आशा सेविका आरोग्याचे कर्मचारी यांना येथील ग्रामपंचायत हातनूर यांनी सेफ्टी किटचे वाटप केले.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करासध्या कोरोनाच्या व्हायरस पार्श्वभूमीवर हातनूर ग्रामपंचायतिने योग्य ती खबरदारी घेत आहे.आशा सेविकाच्या माध्यमातून लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण चालू आहे.सद्या निर्माण झालेली कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायत हातनूर यांनी गावातील आशा सेविका कर्मचार्यांना ग्लोज, मास्क, सॅनिटायझर, डेटॉल साबण इत्यादी गोष्टीचा समावेश असणारे सेफ्टी किटचे वाटप केले.
तसेच कोरोना बाबतचे नियम काटेकोरपणे पाळुन प्रशानाकडून दिलेल्या सुचनाचे पालन करावे असे आवाहन हातनूर गावचे माजी उपसरपंच सचिन पाटील साहेब यांनी केले.
यावेळी श्री. मुळीक एस. जी (कृषी सहाय्यक ) श्री.अजित पाटील,सुरज कुंभार व गावातील आशा सेविका कर्मचारी उपस्थित होते.तरी या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
0 Comments