राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तासगाव कडून गरजूंना धान्य वाटप
तासगाव:-
तासगाव शहर व आजूबाजूच्या खेड्यात परगावाहुन मोलमजुरी करिता आलेले आणि परत जाऊ न शकलेल्या लोकांसाठी सद्यःस्थिती मध्य उदरनिर्वाह फार बिकट होत चालला आहे. होते नव्हते तेवढे पैसे ह्या 10 दिवसात संपले आता पुढचे दिवस कसे काढायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हाताला काम नाही आणि स्थानिक नसल्यामुळे मदत ही लवकर पोहोचत नाही. बरोबर तान्ही मुलं आहेत.
अश्या तासगाव शहरात लगत निमणी रोड, आदित्य मंगल कार्यालय जवळ आणि एम एस ई बी जवळ वस्त्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी त्याच्यांशी संपर्क साधला आणि त्यांना धान्यांचे वाटप केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तासगाव तालुका यांचे वतीने धान्य वाटप
तासगाव शहरात लगत पुढील प्रमाणे करण्यात आले.
निमणी रोड राठोड पाल 10 किट्स
एम एस ई बी जवळ पाल 24 किट्स
धनगर वस्ती क.एकंद 5 किट्स
गोसावी वस्ती कवठे एकंद 57 किट्स
इतर गरजू नागरिक 9 किट्स एकूण -105 किट्सचे वाटप करण्यात आले
अशा पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी त्याच्यांशी संपर्क साधून धान्य आणि डाळी वाटप केले.
कवठेएकंद येथील गोसावी वस्तीत मुबंई हुन यात्रेसाठी आलेली कुटुंब आहेत.तेही अशीच अडकून पडली आहेत.यांना ही ह्या स्वयंसेवकांनी धान्य वाटप केलं आहे.
या वेळी तासगांव तालुका कार्यवाह राजेंद्र माळी, दयानंद पोतदार,जयवंत माळी, नितीन जोशी,गणेश जोशी,विलास पिसे,कपिल शिरोटे,बिडेश पुजारी एड्.अनिल माने,अवधूत वेल्हाळ,हर्षिकेश माळी, डॉ. थोरात उपस्थित होते.
0 Comments