देवराष्ट्रेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायगवाळे कुटुंबाकडून गावातील नागरिकांना मास्क वाटप
देवराष्ट्रे:- सिद्धार्थ कुरणे
आज जगाला हैराण करणाऱ्या कोरोना साथीच्या फैलावामुळे देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली असून, मात्र अजूनही ग्रामीण भागातील नागरिक हे कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या उपाययोजनांबाबत गांभीर्याने घेत नसलेचे दिसत असल्याने आज देवराष्ट्रे येथील अत्यावश्यक भाजीपाला विक्री ठिकाणी भाजी विक्रेते, भाजी खरेदीसाठी आलेले नागरिक व विनामास्क दुचाकी व चारचाकी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क बांधून व वाटप करून गावातील गायगवाळे कुटुंबाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी जनजागृती करत सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत उपक्रम करणेत आले.
यावेळी या कुटुंबातील *ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गायगवाळे, भारतीय रेल्वे लोको पायलट राहुल गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेश गायगवाळे, पूनम गायगवाळे, मनोज गायगवाळे, प्रिती गायगवाळे, अमोल गायगवाळे, संघर्ष गोतपागर, सम्यता गायगवाळे* हे सर्व सदस्य कार्यरत होते.
0 Comments