पाल ता.कराड येथे 300 गरजु कुटुंबाना धान्य वाटप
कराड राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री देवराज पाटील यांचा उपक्रम

कराड:सुरज घोलप बाबा
                     कोरोना विषाणु च्या फैलाव (प्रसार)रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊन (संचारबंदी)च्या काळात अडचणीत सापडलेल्या पाल गावांतील गरजु ३०० कुटूंबांना मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या मार्फत,तसेच श्री खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी व कराड पंचायत समिती चे विद्यमान सदस्य व कराड राष्ट्रवादी चे अध्यक्ष आदरणीय,श्री देवराज दादा पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून लोकांना धान्या चे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली..

तसेच मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या तर्फे
मुख्यमंत्री सहाय्यता(कोरोना) निधि म्हणुन ५ लाख रूपये व ससुन रुग्णालय पुणे
 यांना १ लाख रूपये , आर टी जी यस च्या माध्यमातुन देण्यात आल्याची माहिती आदरणीय,श्री देवराज दादा यांनी दिली..
तसेच यावेळी लोकांनी लॉकडाउन च्या काळात घरात राहून आपली व आपल्या 
कुटूंबाची स्वतः काळजी घेऊन प्रशासनला सहकार्य करण्याचे आवाहन व विनंती आदरणीय,श्री देवराज दादा यांनी केली..