सांगली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी : मिरजेतील लॅबमघ्ये 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह


मिरज : 
          मिरज शासकीय रुग्णालयात सुरू झालेल्या अद्ययावत कोरोना तपासणी लॅबमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसात एकूण 24 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , अशी माहिती  डॉ. प्रकाश धुमाळ यांनी शुक्रवारी दिली.
  मिरज येथील कोरोना (शासकीय) रुग्णालयात गुरुवारी कोरोना लॅब सुरू झाली. या लॅबमध्ये गुरुवारीच पहिल्यांदा 14 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. इस्लामपूर, सांगली, मिरजसह अन्य परिसरातील संशयितांची ही तपासणी करण्यात आली. आठ तासांच्या कालावधी नंतर त्या सर्व  तपासणीचा अहवाल आला. पहिलाच अहवाल सर्वांचा निगेटिव्ह आला आहे. 

  त्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा 10 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचेही आठ तासा नंतर अहवाल आला. त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व सांगली जिल्ह्यातील आहेत.