जनता कर्फ्यूला तासगाव मध्ये उस्फुर्त प्रतिसाद
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात आज जनता कर्फ्यू लागू करण्यात केला आहे. देशभरातून या जनता कर्फ्यूला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातही कडकडीत बंद दिसत आहे. मात्र शहरासोबत ग्रामीण भागातही हा कर्फ्यू तितकाच यशस्वी होताना दिसत आहे. सांगली जिल्हातल्या तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंद दिसून आला. तासगाव येथील एसटी स्टँड परिसर हा कधीही गजबज असणारा परिसर आता शुकशुकाट दिसत आहे. तर गणपती मंदिर परिसरातही परिस्थिती तशीच आहे. मोठ्या दुकानांसह छोट्या व्यवसायिकांनीही कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला. बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलीसदेखील कारणं विचारत आहेत, जनजागृती करत आहेत, अत्यावश्यक असल्या
शिवाय घराबाहेर न पडण्याची विनंती देखील पोलीस करताना दिसत आहे.
0 Comments