हातनोली मध्ये जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद


हातनोली :-(अमीर शिकलगार)
             पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हातनोली परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून रोज लोकांची वर्दळ असलेले रस्ते व चौक हमुमान मंदिर परिसर पहिल्यांदाच निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. गावातील सर्व रस्ते निर्मनुष्य बनले असून सर्वत्र निरव शांतता पाहायला मिळत आहे.
              कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी शहरात सकाळीच सुरुवात झाली. सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक व फिरायला येणाऱ्या लोकांनी घराबाहेर येणे टाळले. दिवस उजाडताच रस्त्यावर,  होणारी गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे शहरात सकाळपासूनच अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. 
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश   दिले आहेत. त्यामुळे कालपासूनच बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. शहरे आणि ग्रामीण भागात जणू कालपासूनच लोकांनी बंद सुरू केला.