हातनूर विसापूर मुख्य मार्गावरील सुभाष पाटील यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने मळुन ठवलेले हरबर्‍याचे तब्बल 9 पोती लंपास केले असून, यामध्ये त्यांचे  50 हजाराचे  नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.


हातनूर मध्ये शेतकर्‍याच्या शेतातून धान्याची पोती लंपास!

हातनूर :
            हातनूर विसापूर  मुख्य मार्गावरील शेतकर्‍याच्या शेतातून अज्ञात चोरट्याने मळुन ठवलेले हरबर्‍याची तब्बल 9 पोती लंपास केले असून, यामध्ये शेतकऱ्याचे 50 हजाराचे  नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे
       हातनूर येथील शेतकरी सुभाष पाटील यांनी 5 दिवसापूर्वी शेतातील गहू , हरबरे मळून शेतात ठेवली होती.त्यातील गव्हाचे धन्य वाळत टाकले होते.तर हरभऱ्या ची पोती भरून ठेवली होती. 6मार्च मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यातील हरभऱ्याची पोथी चोरली.चारचाकी वाहनातून हा माल नेण्यात आला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वीही या हातनूर परिसरातून असेच धान्य चोरीस गेले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील सचिन भोसले यांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली. अद्याप प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.