विट्यात महिलादिनी केला स्त्री शक्तीचा सन्मान व जागर
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. कांचन शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
८ मार्च हा दिवस हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वानं त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज घुमट माळ येथील महिलांना सौ.कांचन शिंदे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शोभा भूमकर यांनी केले.सौ.जिजा विवेक नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सौ.राधिका किसान जगताप व सौ.सारिका अजय चव्हाण यांनी केले.
0 Comments