आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.

विटा:-
          लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे ब्लुमिंग बड्ज नर्सरी स्कुलच्या प्रमुख सौ.विद्या गायकवाड मँडम  व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांच्या  हस्ते  सरस्वती देवी, हणमंतराव  पाटील साहेब याच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
             महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा जागतिक  महिला दिन.हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वानं त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी  व स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी   शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांच्या  हस्ते शाळेंतील सर्व महिला शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
             या कार्यक्रमामध्ये शाळेतील विदयार्थ्यांनी कु.स्वरा कुपाडे  (इ -4वी ) व कु.वर्षा शिंग  (इ -8वी) यांनी मनोगत व्यक्त केले. तसेंच शिक्षिका सौ.स्नेहलता सकटे व सौ.पुष्पा निकम व वहिदा पठाण मॅडम यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनाचे महत्व पटवून दिले.तसेच शाळेंतील अन्य विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले.व त्या माध्यमातून आई बहीण, पत्नी, आजी यांचे  महत्व नृत्याच्या माध्यमातून  चांगल्या प्रकारे पटवून दिले. 
             कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यां सौ.विद्या गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिलांचा व  मुलींचा आदर करा व महिला दिना विषयी सुंदर असे मार्गदर्शन केले.
      शाळेच्या मुख्याध्यापिका  अंजुम बागवान मॅडम यांनी महिला दिना निमित्त भाऊ-बहिणीच्या नात्याचे महत्व सांगितले त्यावेळी अक्षरशा सर्व विदयार्थी व शिक्षकांच्या डोळ्यातून पाणी आले. तसेच  सर्व महिलांचा आदर करा. 
नारी तुम प्रेम  हो,आस्था ही विश्वास हो.
टूटी हुई उम्मीदो की एक मात्र आस हो
हर जान का तूम ही तो आधार हो
नफरत की दुनिया मे तुम ही तो प्यार हो
उठो आपने अस्तिव को सांभालो
केवल एक दिन ही नही
 हर दिन के लिए तुम खास हो
    अशा सुंदर शब्दात विद्यार्थ्यांना महिला दिना विषयी मार्गदर्शन केले.
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कांचन शिंदे  यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.शितल गायकवाड यांनी केले.
       या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वाचे कौतूक केले व जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.