हातनूर मध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

हातनूर:-
            भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. होळी सण महाराष्ट्रमध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण साजरा करतात.


           हातनूर मध्ये मोठया उत्सहात होळीदहन करण्यात आले.काल पासून लहान लहान मुलांनी प्रत्येक घरी जाऊन शेणाच्या गौऱ्या गोळा केल्या.सर्व गोळा केलेल्या शेणाच्या गौऱ्या एकावर एक रचून होळी तयार करून त्याचे दहन करण्यात आले.तसेच काही जणांनी आपल्या घरासमोर होलिका रचून त्याचे दहन करून होळी साजरी केली.