कडेगाव करांनी टाळ्या, घंटा, शंख वाजवून केली कृतज्ञता व्यक्त
कडेगाव:(प्रमोद कारंडे)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी रविवारी २२ मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे. ही आपली परीक्षा आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा यातून समजेल
मोदी म्हणाले होते
हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत. तसेच व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून २२ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळया वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असे असे मोदी म्हणाले.
आज कडेगावकरांनी जनता कर्फ्यू ला उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.कायम गजबलेले बस स्टॅन्ड चौक, कराड रस्ता आज ओस पडले होते.
जर एकदा व्यक्ती इतरत्र फिरताना दिसला तर पोलीस त्याला घरी पाठवत होते.चौका चौका पोलीस उभे होते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पोलीस हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत. अश्या पोलिसांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता कडेगाव करानी आपल्या घरच्या गच्ची वर जाऊन पोलिसांचे स्वागत टाळ्या, शंख वाजवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
ताज्या अपडेट साठी येथे क्लीक करा
0 Comments