चीननंतर कोरोनाच्या भक्षस्थानी इटली का?


सांगली:-शशिकांत पाटील (महाराष्ट्र युवारत्न)
            चीन आणि इटली यांच्यात  इतके मोठे  7562 कि.मी. अंतर असूनही, इतके लोक चीनच्या पाठोपाठ इटलीमध्ये का बाधित होत आहेत?  हा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात येतो.  चीन आशियात तर इटली युरोपमध्ये आहे.
 यात प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की इटली आणि चीनमधील संबंध काय आहे?
  मी थोडासा ऑनलाइन अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष आपणासमोर ठेवत आहे.
 इटलीचा उत्तर भाग फॅशन आणि कपड्यांच्या उद्योगात वाढत आहे.  इटलीच्या फॅशन जगात विविध प्राण्यांचे कातडे आणि विविध पक्ष्यांचे पिसे फार पूर्वी पासून वापरात आणले जात आहेत. जगभरात प्रसिद्ध आणि जुने फॅशन ब्रँड गुच्ची आणि प्राडा हे या भागातले आहे.
 चीन संपूर्ण जगात स्वस्त मनुष्यबळामध्ये उत्पादन देते.म्हणूनच बहुतेक इटालियन ब्रांड चीनबरोबर काम करत आहेत.
          या इटालियन फॅशन हाऊसने चीनमधून कमी पगाराच्या लोकांना आणले आहे.  त्यातील बहुतेक लोक चीनच्या वुहान प्रांतातील आहेत.
 सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चीन आणि इटलीमध्ये विमानाचे शटल उड्डाणे सुरू आहेत आणि एक लाखाहून अधिक चिनी कामगार इटालियन कारखान्यांमध्ये काम करतात.
 हळूहळू चिनी लोकांचे पाय येथे पसरले आहेत आणि बर्‍याच कंपन्यांचे मालकदेखील चिनी लोक झाले आहेत.
          एका अहवालात असेही म्हटले आहे की येथे सुमारे तीन लाख चिनी मजूर राहतात आणि बहुतेक ते इटालियन कपड्यांच्या गारमेंट विभागामध्ये काम करतात.गारमेंट कपड्यांच्या ह्या  हजारो कंपन्या निर्यातीचे काम करतात आणि येथे चीन आणि इटलीचा असा धागा जुळला आहे. हे सर्व माहित असूनही, इटलीचे प्रशासन झोपी गेले आणि तोपर्यंत करोनाने तिथे हात पाय  पसरले आहेत.
            हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की इटलीची 60% लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची आहे व त्यापैकी 23% लोक 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत.  याचा सहज अर्थ असा आहे की इटलीची संपूर्ण लोकसंख्या 6 कोटी मधील 25 टक्के म्हणजे 1.5 कोटी लोकसंख्या आता धोक्यात आली आहे.
           या जीवनाच्या धोक्यासह, आर्थिक धोक्याची स्थिती इटलीमध्ये आहे.
 इटलीच्या 100 अब्ज डॉलर्सच्या फॅशन उद्योगावर पूर्णपणे परिणाम होणार आहे, जो आता चीनवर अवलंबून आहे.
 आतापर्यंत इटलीमधील 53,578 लोक कोरोना ने बाधित झालेले आहेत ,आणि यापैकी 4,825 लोक मरण पावले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची संख्या संख्या केवळ 6,072 आहे, आज संपूर्ण जगभर इटली ही चिंतेची बाब आहे.