जनता कर्फ्यूमध्ये कराड शंभर टक्के सहभागी
कराड -(सूरज घोलप)
कराड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज 100% बंद पाळण्यात आला. कराड शहरात सर्वत्र शुकशुकाट होते. सकाळी दशक्रिया विधी एकाची नातेवाईकांच्या उपस्थितीत झाले. दरम्यान कराडमधील दोन व्यक्ती मयत झाल्यामुळे सकाळी ९ व दुपारी ४ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.
कराड मध्ये जनता कर्फ्यू तंतोतंत पालन करण्यात आले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री दहानंतर शहरातील साफसफाई केली होती. पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी सर्वत्र फिरवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके तयार असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी व उपाय योजना तयार करण्यात आले आहेत.अपवादात्मक काही व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जात होती. कशासाठी ? शहरांमध्ये आलेत याबाबत माहिती घेऊन त्यांना सदर घटनेचे गांभीर्य सांगून परत पाठवले जात होते.दरम्यान ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर व गलरीत येवून घंटानादद, थाळीनाद, टाळ्यांचा निनाद केला.लहान मुले "कोरोना गो"करीत होते. पाच मिनिटांसाठी घराबाहेर आलेल्या लोकांना पुन्हा पोलिसांनी आवाहन करून घरांमध्ये परत पाठवले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर एक वाहनही दिसत नव्हते.
0 Comments