कोरोनामुळे रेवणसिद्ध मंदिर दर्शनासाठी बंद.

 कोरोनामुळे  रेवणसिद्ध मंदिर दर्शनासाठी बंद.

कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळं खानापूर तालुक्याचे आराध्य दैवत रेवणसिद्ध मंदिर  17 मार्चपासून 31 मार्च पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय गणपती मंदिर ट्रस्टने घेतला आहे. याची सर्व भक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.



विटा:-  
              कोरोनामुळं संपुर्ण देशात खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत चालला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे
महाराष्ट्रातील आहेत. प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत यापुर्वीच सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक देवस्थानांनी मंदिरे
दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय यापुर्वीच
घेतलेला आहे. आता रेवणसिद्ध मंदिर ट्रस्टने देखील दि. 17 मार्चपासून 31 मार्च पर्यंत  जनहितासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती रेवणसिद्ध मंदिर  देवस्थानचे ट्रस्टचे व्यवस्थापक यांनी दिली.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपवरती सहभागी होण्यासाठी क्लिक करा. आणि बातम्याचे अपडेट मोबाईलवरती मिळवा.


Reactions

Post a Comment

0 Comments