उन्हाळ्यात आपला आहार कोणता असावा? 


उन्हात खूप काळ फिरणं, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणं, अतिव्यायाम करणं, तळलेले, मसालेदार व तिखट पदार्थ जास्त प्रमाणातखाणं या गोष्टींमळे उन्हाळ्यातील समस्या वाढतात. या काळात आहाराचीम्हणून पथ्ये पाळलीच पाहिजेत. त्यासाठीच्या काही टिप्स


उन्हाळ्यातील आहार-

◾️न्हाळ्यात पचायला हलका व लघु आहार घ्यावा. उन्हाळ्यात वात व पित्तदोषाची वृद्धी होत असते त्यामुळे या काळात वातुळ, पचायला जड,
तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा.
◾️मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावं.
◾️टरबूज, खरबूज,संत्री, मोसंबी, केळी, सिताफळ,
काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचं सेवन
वाढवावं. तसेच थंड तुपाचाही आहारात समावेश करावा.
◾️उन्हाळ्याच्या दिवसांत जास्तीत जास्त द्रवाहार करावा. नारळपाणी,उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा.
◾️जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. 
◾️उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.
◾️फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिण्यापेक्षा
मटक्यातील सौम्य थंड पाणी प्यावं
◾️लोणी, श्रीखंड, मावा, दही, पनीर,लस्सी शक्यतो टाळावं. 
◾️मद्यसेवन पूर्ण वर्ज करावं
◾️उन्हाळ्यात शरीरातील मिठाचं पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे 
◾️शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं
व भाज्यांचे रस, सरबतं आणि द्रव पदार्थाचं खूप सेवन केलं पाहिजे. मात्र हे घेताना यात साखर सेवन करू नये,साखरेमुळे शरीरातील आम्लधर्मी
गुणधर्म वाढून चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होतो
◾️उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी तसेच सायंकाळी बागेमध्ये गवतावर अनवाणी चालावं. रात्री झोपताना काश्याच्या वाटीने तळपाय चोळावेत.
◾️अंघोळीसाठी तसेच वापरासाठी थंड
पाणी वापरावे.
◾️उन्हाळ्यात शक्य झाल्यास दिवसा थोडी झोप घ्यावी.शारीरिक-मानसिक समाधान मिळतं.