बस दुचाकीची धडक दोघांचा मृत्यू.

हातनूर खानापूर रस्त्यावरील होनाई मंगल कार्यालय जवळ  एसटी बस व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री 9:00च्या सुमारास झाला. विक्रम शिवपुंजे  (वय 32) व सौरभ सुतार (वय 22) , रा.हातनूर  ता. तासगाव, जि.सांगली) अशी मृतांची नावे आहेत.

हातनूर:-
         हातनूर खानापूर रस्त्यावरील होनाई मंगल कार्यालय जवळ  एसटी बस व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री 9:00 च्या सुमारास झाला. विक्रम शिवपुंजे  (वय 32) व सौरभ सुतार (वय 22) , रा.हातनूर  ता. तासगाव, जि.सांगली) अशी मृतांची नावे आहेत.
      मिळालेल्या  माहितीनुसार, हातनूर खानापूर मार्गावरील होनाई मंगल कार्यालया जवळ झालेल्या अपघातामधील मोटारसायकल,(के.ए 47 ई 8080) पेड कडून  हातनूर कडे येत होती, तर तासगाव खानापूर ही बस खानापूरच्या दिशेने जात होती.मोटारसायकल व बस यांची एकमेकांस धडक बसून हा अपघात झाला.हा अपघात एवढा भयानक आहे की मोटारसायकल वरील एकाचा  जागीच मृत्यू झाला. तर एकाला उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. 
       विक्रम शिवपुंजे व  सौरभ सुतार यांच्या अपघाती मृत्यू ने हातनूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.