सांगलीतून मुलांचे अपहरण ;साताऱ्यात सुटका.
सांगली :-
सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलीस व सातारा रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला. रात्री अकराच्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्स्प्रेसने तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. त्यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी साताऱ्यात मध्यरात्री ताब्यात घेतले. रमेश श्रीरंग झेंडे (वय 25, रा-बलवडी, ता- खानापूर, जि-सांगली ) असे अपहरणकर्त्याचे नाव असून. अपहरण करण्यात आलेले तिन्ही मुले सांगलीच्या हनुमान नगर परिसरातील होती.ती बुधवार 4 मार्च पासून गायब होती. ती तीनही मुले सुखरूप आहेत. फूस लावून अपहरण करणाऱ्या व्यक्तीकडे विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत असून यातून मुलांच्या अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हनुमाननगर येथील सहाव्या गल्लीत राहणारे तिघेही रोज खेळण्यासाठी एकत्र येत होते.काल नेहमीप्रमाणे सकाळी खेळण्यासाठी ते एकत्र आले होते. त्यावेळी सायंकाळी फिरत-फिरत ते सांगली रेल्वेस्थानकावर आले होते.त्यावेळी
संशयित रमेश झेंडे हाही तेथे होता. तो
तिघांच्या जवळ गेला. त्याने तिघांची
विचारपूस करण्यास सुरवात केली.
त्यानंतर मुंबईत वडिलांकडे घेऊन जातो असे
सांगितले. उचलून तिघांनाही रेल्वेत बसून घेऊन जाऊ लागला. दरम्यान सकाळपासून तिघे मुले घरी नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केला. त्या वेळेस त्या भागातील नगरसेवक अभिजित भोसले यांच्याशी संपर्क साधाला.त्यावेळी ते आणि भागातील नागरिकांनी शोध सुरू केला. अभिजित भोसले यांना फोन आला हनुमान नगर भागातील तीन लहान मुले महालक्ष्मी एक्सप्रेस ने प्रवास करीत असून त्याच्या सोबत एक संशयित आहे. त्यांनी लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली.पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे त्यांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपीस सातारा रेल्वे स्थानकातुन ताब्यात घेतले.व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली.
0 Comments