हातनूर:-(शशिकांत भोरे)
              तासगाव तालुक्यातील हातनुर  येथील रहिवासी आणि सांगली येथील सुवर्णं ज्वेलर्स चे मालक पै.विक्रम नारायण शिवपुंजे  (वय 33) यांचे शुक्रवारी रात्री अपघाती निधन झाले. आपल्या मित्रांच्या गोतवळ्यात रमणारे विक्रम यांच्या अपघाताची बातमी गावासह परिसरात वाऱ्यासारखी धडकताच कुटुंबीय, नातेवाइक आणि मित्राच्या काळजात एकच धस्स झाले. या अपघाताच्या बातमीवर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही. मात्र खात्री झाल्यावर सर्वांच्या आश्रूचा बांध फुटला आणी विक्रमच्या अचानक झालेल्या या‘एक्झिट’ने हातनूर गावासह परिसरात शोककळा पसरली. 
   

 सुख दुःख जाणणारा दिलदार मित्र विक्रम


     पै.विक्रम शिवपुंजे यांना मित्रांमध्ये रमायला खूप आवडायचे म्हणूनच त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. ते आपल्या प्रेमळ व दिलदार स्वभावामुळे त्यांचे अनेक मित्र परिवार होता. ते नेहमी मित्रांमध्ये रममान व्हायचे. त्यांना आपल्या मित्राच्या सुखदुःखाच्या गोष्टी लगेच करायच्या म्हणूनच ते नेहमी मित्राच्या सुख-दुःखात पुढे असायचे. मित्राला संकटातून वाचविण्यासाठी हे जीव ओवाळून टाकायचे असा या जीव लावणाऱ्या मित्राची अचानक एक्झिट झाल्याने  त्यांचा मित्रपरिवार सुना सुना झाला आहे.