टाळ्या, घंटा, शंख वाजवा; अमिताभ बच्चननी केलं आवाहन


मुंबई :
           देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज म्हणजे रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत 'स्वयंम संचारबंदी' जनता कर्फ्यू चे आवाहन जनतेला केले आहे. त्यांच्या या निर्णयाला सर्वच स्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. 
    या महत्त्वपूर्ण निर्णयाला   बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी उद्या  जनता कर्फ्युचं पालन करण्याचं आवाहन देशातील नागरिकांना केलं आहे. ते म्हणाले की ,'उद्या संपूर्ण देशात जनता कर्फ्यु असणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. २२ रोजी संध्याकाळी पाच वाजता घराच्या खिडकीत, दरवाज्यात आणि गंच्चीवर जाऊन टाळ्या, घंटा, शंख वाजवून कठिण परिस्थितीमध्येही स्वत:च्या जीवाची पर्वा न करणाऱ्या निस्वार्थी लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहे.' 
आणि तुम्ही ही कृतज्ञता व्यक्त करा असे आवाहन केले आहे.