सांगली जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना विषाणू बाधीत नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही;डॉ. संजय साळुंखे
सांगली:
सध्या जगभरात कोरोना या व्हायरसने थैमान घातले आहे. याच व्हायरसचा प्रसार कुठल्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्यात होऊ नये म्हणून सांगली जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. विदेशवारी करून आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 348 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 19 व्यक्तींना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. या 19 व्यक्तींच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी 12 स्वॅब टेस्ट निगेटीव्ह आल्या असून 7 स्वॅब टेस्टचा रिपोर्ट येणे बाकी आहे. सांगली जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना विषाणू बाधीत नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. सांगली जिल्ह्या सद्यस्थित 7 व्यक्तीआयसोलेशन कक्षात असून यापैकी सांगली सिव्हील हॉस्पीटल मध्ये 5, मिरज सिव्हील हॉस्पीटलमध्ये 1 व भारती हॉस्पीटलमध्ये 1 व्यक्ती आहे. 309 व्यक्ती होम क्वॉरंटाईममध्ये निरीक्षणाखाली असून 20 व्यक्तींचा 14 दिवसांचा निरीक्षण कलावधी पूर्ण झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
बातम्याच्या ताज्या अपडेट साठी येथे क्लीक करा.
0 Comments