विटेकरांचा ‘जनता कर्फ्यू’ला ऊस्फूर्त प्रतिसाद; शहरात शुकशुकाट
विटा:
पंतप्रधान मोदी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला विटेकारांनी सकाळपासूनच उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील गजबजणारी ठिकाणी ओस पडलेली दिसून आली.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून जनता कर्फ्यू चे आवाहन केले होते. दरम्यान आज देशभरात जनता कर्फ्यूला लागू आहे. विट्यातील नागरिकांनी यास प्रतिसाद देत शहर बंद ठेवले आहे.
विटा नगरपरिषद व विटा पोलीस याच्या वतीने लोकांना घराच्या बाहेर न पाडण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत विटेकरांनी घरातच बसणे पसंद केले.त्यामुळे शहरातील शिवाजी चौक.चौडेश्वरी चौक यासारखे मुख्य रस्ते चौक ओस पडले होते.
0 Comments