पोल्ट्री व्यवसाय संकटात
विटा:-
शेतीला जोडधंदा असलेला पोल्ट्री व्यवसाय ‘कोरोना’ व्हायरसमुळे चांगलाच संकटात सापडला आहे. मागील एक महिन्यापासून कोरोना व्हायरस बद्दलच्या पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अफवा पसरत आहेत. या मेसेजचा धसका मांसाहार करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. परिणामी, शहरांसह ग्रामीण भागातील चिकनच्या विक्रीमध्ये ७० टक्क्यांनी घट झाल्याचे मटन विक्रेत्यांनी सांगितले आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांना दररोज हजारो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतीला जोडधंदा असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. दरम्यान देशात आणि राज्यात कोरोनाची प्रचंड धास्ती वाढली आहे.चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या सोशल मिडियावर कोरोना विषाणूच्या चुकीच्या अफवेमुळे नागरिकांनी चिकनकडे पाठ फिरविली आहे. वास्तविक चिकनचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसतानाही केवळ अफवेमुळे देशभरातील पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे.
कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्व शेतकरी आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री उद्योग शेतात सुरू केला आहे. कुक्कुट पालन व्यवसायात साधारणत: प्रतिकिलो उत्पादन तयार करण्यासाठी किमान 70 रुपयांहून अधिक खर्च येतो आणि सध्या कोंबड्या फुकट घेउन जा, अशी अवस्था पोल्ट्री धारकांची झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योग पुरता रसातळाला गेला आहे. अश्यावेळी सरकारने पोल्ट्री धारकाला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
0 Comments