राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना लहुजी शक्ती सेना तसेच भीम आर्मी या संघटने कडून मास्क वाटप 


कराड : (सूरज घोलप)
              येथील राष्ट्रीय बेरोजगार संघटना,लहुजी शक्ती सेना व भीम आर्मीचे तर्फे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्कचे वाटप सुरू करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शनिवार पेठेतील महिलांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.
          नागरिकांनी कि घाबरून जाऊ नये, तसेच अफवावर विश्वस ठेवू तसेच काही शंका असल्यास कराड नगरपालिकेसी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.
          कराड शहर मेन रोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा सपाटे साहेब व लहुजी शक्ती सेना अध्यक्ष सुरज घोलप व भीम आर्मीचे अध्यक्ष संतोष थोरवडे व आरोग्य सभापती महेश कांबळे यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना राष्ट्रीय बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष मा इम्रान मुल्ला म्हणाले हा समाज ही एक घटक आहे त्यांच्या कडे कोणत्याही पक्षाचे नेते किंवा कोणतेही आमदार खासदार यांचे लक्ष नाही त्यामुळे संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून मास्क वाटप करण्यात आले
       यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते बंटी लोंखडे सुनील सूर्यवंशी सचिन भिसे (तात्या) विकी सूर्यवंशी तोफिक बागवान राजू पुजारी तोसिफ अत्तार सत्या काटे शिकलगार उपस्थित होते.