अंकलखोप मधील दुकाने, पानपट्टी व हॉटेल 31मार्च पर्यत राहणार बंद.

अंकलखोप मधील दुकाने, पानपट्टी व हॉटेल  31 मार्च पर्यत राहणार बंद.


भिलवडी:- (सिद्धार्थ कुरणे)
                  पलूस तालुक्यातील अंकलखोप  येथील सर्व पानपट्टी, दुकाने, हॉटेल 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्याना करण्यात आले आहे.
            सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या व्हारसचा परिणाम चीनमधील अनेक उद्योग धंद्यांवर झाला आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसला असून कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्राला देखील बसला आहे.महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे संशयित रुग्ण आढलल्याने महाराष्ट्र शासन योग्य ती खबरदारी च्या दृष्टीकोनातून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत.पानपट्टी, दुकाने, हॉटेल या ठिकाणी लोकांची गर्दी खूप असते त्यामुळे 31 मार्च पर्यत पानपट्टी हॉटेल बार हे बंद करण्याचे आदेश आहेत. 
         त्यामुळे अंकलखोप ग्रामपंचायतच्या वतीने या पानपट्टी दुकाने हॉटेल  यावर होणारी लोकांची गर्दी  टाळण्यासाठी व कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 31 मार्च पर्यंत गावतील पानपट्टी,दुकाने हॉटेल ,बंद करण्यात यावे असे आवाहन.सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,
ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत अंकलखोप यांच्या वतीने करण्यात आले आहे.


बातम्याच्या ताज्या अपडेट साठी येथे क्लिक करा.



Reactions

Post a Comment

0 Comments