राज्यतील सर्व सलून दुकाने
23 मार्चपर्यंत राहणार बंद.


सांगली :
         आज जगातील परिस्थिती एका व्हायरसमुळे अतिशय नाजूक झाली आहे. कोरोना वायरस (कोव्हीड १९) या वायरस ने संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार माजवला आहे.त्याचप्रमाणे भारतात व महाराष्ट्रामध्ये बरेच संशयित आढळले आहे. शासन स्तरावर या वायरस ला थांबविण्यासाठी बऱ्याच प्रमाणात हालचाली चालु आहेत.संसर्गजन्य असलेला हा वायरस श्वासाव्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतो. त्यातच सलून व्यवसाय हा जनतेच्या जास्तीत जास्त संपर्कात येणारा व्यवसाय आहे. त्यामुळे त्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी म्हणून 21 मार्च 23 मार्च पर्यंत पूर्ण राज्यतील सलून ची दुकाने बंद ठेवण्यात यावी असे आवाहन श्री. कल्याण दळे अध्यक्ष,महाराष्ट्र नामिक महामंडळ,महाराष्ट्र राज्य. यांनी पत्रकाच्या आधारे केले आहे.

बातम्याच्या ताज्या अपडेट साठी येथे क्लीक करा.