विट्यामध्ये एस.टी बस दोन ट्रॅक्टर चा तिहेरी अपघात.
विटा पारे रस्त्यावरील बजरंग नगर जवळ एसटी बस व दोन ट्रॅक्टर याचा तिहेरी अपघात झाला असून यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले.एस.टी बसच्या ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असून.या अपघातामध्ये बस मधील प्रवासी सुमारे एक तासापर्यंत बसमध्येच अडकून पडले होते.या अपघातानंतर बस चालक व नागरिक याच्या मध्ये खडाजंगी झाली.
विटा-
विटा पारे रस्त्यावरील बजरंग नगर जवळ एसटी बस व दोन ट्रॅक्टर याचा तिहेरी अपघात झाला असून यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले.या अपघातानंतर बस चालक व नागरिक याच्या मध्ये खडाजंगी झाली.
मिळालेल्या माहिती अशी की ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (MH 13 I 8486 ) पारेच्या दिशेने चालला होता. तर एक ट्रॅक्टर विट्याचा दिशेने येत होतो. त्याच वेळी विटा कडून पारेच्या दिशेने बस (MH 14 BT 1258) येत होती. बस ट्रॅक्टर ओव्हर टेक करत असताना वळणावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये बस मधील प्रवासी सुमारे एक तासापर्यंत बसमध्येच अडकून पडले होते. या अपघातानंतर येथील नागरिकांनी बस मधील सर्व प्रवासांना सुखरूप बाहेर काढले. अपघात नंतर त्या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती.
0 Comments