म्हासुर्णे ग्रामपंचायतीकडुन प्राथमिक आरोग्य केंद्रास औषधे पुरवठा
म्हासुर्णे:- तुषार माने
खटाव तालुक्यातील म्हासुर्णे ग्रामपंचायतीकडुन कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लागणारे औषधे पुरवठा व साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सोलनकर यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले.
कोरोनाचा नाश करण्यासाठी म्हासुर्णे ग्रामपंचायत अनेक उपाययोजना करत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ज्या साधन सामग्रीचा आपुरा साठा आहे किंवा साधन सामग्री नाही त्या साधन सामग्रीचा ग्रामपंचातीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या आहेत.आरोग्य विभागाकडील औषधे व साहित्य व ग्रामपंचायतीने दिलेले औषधे व साहित्य जे लोक पुणे व मुंबई व बाहेरुन आलेले लोक यांच्या मागणीनुसार पोहचवण्याचे काम डॉक्टर सोलनकर व काळे सिस्टर यांच्या माध्यमातून होणार आहे. ग्रामपंचायतीकडुन कपसिरप,पँरॉसिटल टँबिलेट,सेट्रीजीन टँबिलेट,अॉनॉक्सीलीन,पँरॉसिटलम सिरम अशा अनेक वस्तु डॉक्टर सोनलकर यांच्या कडे सरपंच सचिन माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,सिकंदर मुल्ला,संगिता गुरव,तृप्ती थोरात ,अजित माने यांच्या कडुन देण्यात आल्या.यावेळी डॉक्टर शिंदे काळे सिस्टर,आशा सरकाळे,रेश्मा चव्हाण,राणी माने,नलिनी माने,विमल कुलकर्णी उपस्थित होत्या.
0 Comments