"मुंबईहून कराडकडे येनारी कार पलटी".  


कराड:-सुरज घोलप
              कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईहून ढेबेवाडीकडे निघालेली कार खोडशी(ता.कराड)येथे चालकाचा ताबा सुटून दोघे जखमी झाले आहेत.दोन्ही जखमी कराड आणि पाटण तालुक्यातील असून पुणे -बंगळूर महामार्गावर शनिवार सकाळी 6.30.वाजता हा अपघात झाला आहे.बाजीराव विठ्ठल यादव(वय52,बनपूरी) चंद्रकांत घारे(वय42,रा घारेवाडी)अशी जखमींची नावे आहेत.तर अश्र्विन नंदकुमार मोहिते(वय32.रा.भुंईज)असे चालकाचे नाव आहे.मुंबईहून कराडकडे येताना खोडशीतील श्रीराम मंगल कार्यालयाजवळ कार पलटी झाली.त्यानंतर कारने तीन वेळा पलटी खाल्ली.यात दोघे जखमी होऊन कारचे मोठे नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी महामार्ग पोलीस, महामार्ग मदत क्रेंद्राचे पथक आणि कराड शहर पोलिसांच्या मदतीने जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.