म्हासुर्णे गाव २४ तास बंदला चांगला प्रतिसाद


म्हासुर्णे:  तुषार माने
             कोरोना पासुन बचाव करण्यासाठी व कोरोनाला पळवुन लावण्यासाठी म्हासुर्णे गावात अनेक प्रकारच्या उपाययोजना म्हासुर्णे ग्रामपंचायत करत असते आतापर्यंत म्हासुर्णे गावात चांगल्या प्रकारे बंदला प्रतिसाद देत आहे पण अत्यावश्यक सेवा सुरु आहेत त्यामध्ये किराणा दुकान,दवाखाना,मेडीकल, दुधडेअरी,दुकाने सुरू होती परंतु गावातील काही जण दुकानातुन माल आणायचा आहे व दवाखान्यात निघालो औषधे आणायला निघालो अशी थातुर मातुर कारणे सांगुन गावात फिरत असत.

यासाठी म्हासुर्णे ग्रामपंचायतीकडुन म्हासुर्णे गाव २४ तास बंद ठेवण्यात आले आहे.२९ ३-२०२० रोजी सकाळी ७ वाजल्यापासुन ३०-३-२०२० रोजी सकाळी सात वाजेपर्यंत पुर्ण म्हासुर्णे गाव बंद आहे व ३०-३-२०२० रोजी सकाळी ७ वाजल्यापासुन म्हासुर्णे गावात फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान,मेडीकल,दवाखाना,दुधडेअरी,भाजीभाला दुकान ठरावीक वेळ सुरू रहाणार अशी माहिती सरपंच सचिन माने व ग्रामपंचायत सदस्य तुषार माने व पोलीस पाटील विकास माने यांनी दिली.म्हासुर्णे गावातील लोकांनीव व्यापारी वर्गाने या गाव बंदला चांगला प्रतिसाद देत आहे.अशाच प्रतिसाद म्हासुर्णे ग्रामपंचायतीस इथुन पुढील काळात सर्व लोकांनी द्यावा म्हणजे नक्कीच आपण लवकरात लवकर कोरोनावर मात करु असे आवाहन सरंपच सचिन माने व ग्रामपंचायत सदस्य तुषार माने व पोलीस पाटील विकास माने यांनी सर्व गावातील लोकांना केले आहे