महाराष्ट्र आजपासून लॉकडाऊन; सर्व शहरांत जमावबंदी लागू

भारतात करोनाचे संकट गडद होत असल्याने राजस्थान, पंजाब, ओडिशानंतर महाराष्ट्रातही संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व काही बंद ठेवण्यात येणार आहे.


मुंबई:
         करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज  सकाळपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व नागरी भागांत १४४ लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ राज्यात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असणार आहे.
           मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याला संबोधित केलं.

लॉकडाऊन मध्ये काय बंद असेल?

◾️परदेशातून येणारी वाहतूक बंद.
◾️ मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद.
◾️जीवनावश्यक वस्तूंची वगळता इतर दुकानं बंद.
◾️अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट
◾️बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद.
◾️शाळा, महाविद्यालयं बंद.
◾️मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद.
◾️मोठ्या प्रमाणावर कार्यालयं बंद.
◾️कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सेवा.
◾️शासकीय कार्यालयांमध्य फक्त
◾️पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थित

🔘 लॉकडाऊन मध्ये काय सुरु असेल 🔘

◾️जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू.
◾️धान्य, किराणा मालाची दुकानं सुरु.
◾️भाजीपाला वाहतूक सुरु
◾️औषधांची दुकानं सुरु.
◾️बँका, शेअर बाजार आणि
आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था सुरु.
◾️वीजपुरवठा कार्यालय सुरु.